🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात एकीकडे करोनारुपी संकट वाढत असताना, दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. आज (शनिवार) सलग चौदाव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ कायम ठेवल्याचे दिसून आले. दरम्यान, आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५१ पैशांची तर डिझेलच्या दरात ६३ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७८.८८ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ७७.६७ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. तर, मुंबईत आज पेट्रोल ८५.६८ रुपये प्रति लिटर व डिझेल ७६.१ रुपये प्रति लिटर झाले आहे.
मोदींसमोरच उद्धव ठाकरे म्हणाले भारत मजबूत आहे, मजबूर नाही डोळे काढून हातात देऊ
पुण्यात पेट्रोल ८५.४१ रुपये प्रति लिटर व डिझेल ७४.६९ रुपये प्रति लिटर आहे. तर, चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८२.२७ रूपये प्रति लिटर आणि ७५.२९ रूपये झाले आहेत, कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे ८०.६२ रूपये प्रति लिटर आणि ७३.०७ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.
MPSC’चा निकाल जाहीर, चौगुले पहिला तर शेतकरी पुत्र दादासाहेब दराडेची गरुडझेप
जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नव्हती. या काळातील लॉकडाउनच्या कालावधीत इंधनाचा वापरही मोठय़ा प्रमाणात कमी झाला होता. मात्र, आता गेल्या १४ दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचं सत्र मात्र कायम आहे. तर, एकूण १४ दिवसांमध्ये पेट्रोल ७.६० रुपये व डिझेल ८.२८ रुपये प्रति लिटर वाढले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
