Share

त्यावरून देवेंद्र फडणवीसांचा ढोंगीपणा उघड झालाय; नाना पटोलेंचं वक्तव्य

Published On: 

मुंबई :  उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून आठ बसची तोडफोड झाली आहे. ठाण्यात बस बंद आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत. महाविकास आघाडीतील नेते हे रस्त्यावर उतरून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आणि व्यापारी वर्गाला आवाहन करत आहेत.

आम्ही फडणवींसानां अनेक वेळा सल्ला दिला की दुष्काळाच्या काळात दौरे करण्यापेक्षा केंद्र सरकारचा राज्य सरकारच्या बाबतीत जो दुजाभाव बोलावे. आताही राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १५ हजार कोटींची मागणी केली आहे. त्याला नाममात्र पैसे देण्याचे केंद्राने मान्य केले आहे. राज्य सरकारवर आरोप करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी केंद्राकडे जाऊन राज्याच्या सरकारला आणि राज्यातला शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत होईल यासाठी काम करायला हवे. मात्र ते जे बोलतायत त्यावरून फडणवीसांचा ढोंगीपणा राज्याच्या शेतकऱ्यांना दिसून येत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

लखीमपूर येथे केंद्रातल्या गृह राज्यमंत्री ज्यांच्यावर खुनाचे हायकोर्टात ट्रायल सुरु आहे, त्यांच्यावर नेपाळ आणि भारतात स्मगलिंग केल्याचाही आरोप आहे. अशा अजय मिश्रा नावाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याची घटना दुर्दैवी आहे, असं नाना पटोले म्हणाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!