🕒 1 min read
अंबाजोगाई : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त आज अंबाजागाई येथे आदिशक्ती योगेश्वरी मातेचे पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांनी दर्शन घेतले. यावेळी पंकजा मुंडे यांनी अन्नदात्या बळीराजाला सर्व संकटांतून मुक्त कर आणि कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना आदिशक्ती योगेश्वरी चरणी केली.
नवरात्रोत्सवानिमित्त पंकजा मुंडे व खा.डॉ.प्रितम मुंडे दरवर्षी परंपरेनुसार योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी अंबाजोगाई शहरात आल्या होत्या. सकाळी भगवान बाबा चौकात कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मंदिरात जाऊन त्यांनी आदिशक्ती योगेश्वरी मातेची मनोभावे पूजाअर्चा केली आणि दर्शन घेतले. अन्नदात्या बळीराजाला सर्व संकटातून मुक्त कर आणि कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना आदिशक्ती चरणी केली. यावेळी आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, गयाताई कराड , भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे उपस्तीत होते.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित आज परंपरेनुसार अंबाजोगाई येथे आदिशक्ती योगेश्वरी मातेचे दर्शन घेतले व मनोभावे पूजाअर्चा केली.
अन्नदात्या बळीराजाला सर्व संकटांतून मुक्त कर आणि कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना आदिशक्ती योगेश्वरी चरणी केली। pic.twitter.com/gRSbHTKGjn
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 13, 2021
राज्य सरकारने ७ ऑक्टोबरपासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे खुली करण्याचे आदेश दिले आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर व बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीच्या मंदिरात तयारी सुरू झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दोन्ही ठिकाणी उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. यात नवरात्रोत्सवादरम्यान दररोज १५ हजार भाविकांना तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता येणार आहे, तर अंबाजोगाईत कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरक्षिततेचे सर्व उपाय केले जाणार आहेत.
दुर्गाष्टमी निमित्त आज अंबाजोगाई येथे
मा @Pankajamunde ताईंसोबत आदिशक्ती योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले। pic.twitter.com/6OtXt1Rldp— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) October 13, 2021
महत्वाच्या बातम्या
- 100 टक्के क्षमतेनं थिएटर सुरु करा, अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली मागणी
- ‘महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली’, राजनाथ सिंह यांचा दावा
- ‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं लक्षण’
- पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच सामूहिक प्रयत्न करावे लागतील – वळसे पाटील
- ‘खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
