Share

केवायसीच्या नावाखाली लोकांची फसवणूक,गृह मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन, त्याचबरोबर अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या ऑफिसला देखील बळी पडत असतात. याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत, याबाबतची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.

‘सायबर दोस्त’ या सरकारी नावाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत सायबर क्रिमिनल केवायसीच्या नावाखाली लोकांना फसवत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आजकाल फ्रॉड करणारे गुन्हेगार लोकांना केवायसीच्या नावावर कॉल किंवा SMS करून लोकांच्या पर्सनल डिटेल्स घेऊन त्यांच्या अकाउंटमधून पैसे चोरी करत आहेत. त्यामुळे कॉल किंवा मेसेज, मेलवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असं आवाहन गृह मंत्रालयाने नागरिकांना केलं आहे.

या बाबीपासून सतर्क रहा-

* केवायसी नसल्यामुळे तुमचं बँक अकाउंट बंद होईल, असा मेसेज आल्यास बँकेच्या ऑफिशियल नंबरवर संपर्क साधून याबाबत योग्य माहिती घ्या.

* अनोळखी नंबरवरून कोणताही फोन किंवा मेसेज आल्यास तुमचे पर्सनल डिटेल्स देऊ नका.

* Anydesk आणि TeamViewer सारखे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करू नका. यामुळे तुमची सहज माहिती त्यांना मिळू शकते.

* सरकारकडून वेळोवेळी फेक मेसेजेसच्याबाबतीत अलर्ट केलं जाते. कोणत्याही अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फोन किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!