बीड : केज शहरातील नवचेतना महिला उद्योग आणि महिला मल्टिपल निधी लि. बँकेच्या अध्यक्षा मनीषा सीताराम घुले यांनी बनावट राजीनामा घेत संचालक मंडळातून काढून टाकून उद्योग आणि बँकेसाठी घेतलेल्या ६ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून केज पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील समता नगर भागातील समाजसेविका मनीषा घुले या नवचेतना महिला उद्योग आणि महिला मल्टिपल निधी लि. बँकेच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती रामेश्वर सांबरे (रा. शुक्रवार पेठ, केज) व साक्षीदार विजया कांबळे यांना या संस्थेच्या संचालक मंडळावर घेतले होते. त्यानंतर त्यांनी नवचेतना महिला उद्योगासाठी २ लाख ४० हजार रुपये व मल्टिपल निधी बँकेसाठी ४ लाख रुपये अध्यक्षा मनीषा घुलेंकडे जमा केले.
मनीषा घुलेंनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून ज्योती सांबरे व विजया कांबळे यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता व नोटीस न देता त्यांच्या नावे बनावट राजीनामा तयार करून त्यावर बनावट सही करून तो राजीनामा खरा म्हणून वापरून संचालक मंडळातून कमी केले व सहा लाख चाळीस हजारांची फसवणूक केली. तुम्हाला बघून घेऊ अशा धमक्या दिल्या, अशी फिर्याद ज्योती सांबरे यांनी दिल्यावरून मनीषा घुलेंविरुद्ध केज पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार दादासाहेब सिद्धे करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

