औरंगाबादः ऑमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. विविध देशातून येणाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. नुकतेच औरंगाबाद शहरात विदेशातून आलेल्या ४६ जणांची तपासणी करण्यात आली विशेषतः यामध्ये चार जण हे दक्षिण आफ्रिकेतून आले असल्याने प्रशासनाला चिंता सतावत होती. चारपैकी दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर दोघांची १५ डिसेंबरला चाचणी घेतली जाईल. दहा जणांशी संपर्क झालेला नाही.
शनिवारी औरंगाबादेत ४६ जण विदेशातून आले. उर्वरीत ४४ जण शहरातील आहेत. त्यापैकी ४ जण दक्षिण आफ्रिकेतील आले. दोघेजण सिडको एन-४ मधील असून दोघे मुकुंदवाडीतील आहेत. ८ डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावर दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. शहरात येताच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुकुंदवाडीतील दोघांनी प्रवासादरम्यान चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.
त्यांची पुन्हा १५ डिसेंबर रोजी चाचणी केली जाईल. सिंगापूर येथून आलेल्या तिघांची विमानतळावरील चाचणी निगेटिव्ह आली. मात्र दहा प्रवाश्यांनी अद्याप संपर्क झालेला नाही, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा जोगदंड यांनी सांगितले. महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून ऑमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर तपासणी केली जात आहे. विदेशातून आलेल्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे शहरात अद्याप एकही ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आज गोपीनाथ मुंडे असते तर भाजपसोबत युती कायम राहिली असती’
- ‘रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार’
- जयंत पाटलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या करेक्ट बाराच्या ठोक्याला शुभेच्छा
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेगा जॉब फेयरचे आयोजन
- ‘शिखर धवन लवकरच पुनरागमन करेल’, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केला विश्वास

