Share

महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ लोकप्रिय माजी खासदाराचे झाले कोरोनामुळे निधन

Published On: 

मुंबई : भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनाच्या आजारात निधन झाले, ते ७१ वर्षांचे होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. त्यानंतर, त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दैनिक लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

हरिभाऊ जावळे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. जळगावमध्ये त्यांची स्वॅबची चाचणी केली असता कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जावळे यांना उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हरिभाऊ जावळे यांची यावर्षीच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात जळगाव जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी निवड झाली होती. हरिभाऊ जावळे हे दोन वेळेस आमदार तथा दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद देखील भूषवले होते.

भाजप नेते हरिभाऊ जावळे यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी, एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे. हरिभाऊ यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीमध्ये एकच शोककळा पसरली आहे.

इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा पाकिस्तानने केला अमानुष छळ

मोठी बातमी : रुग्ण संख्यात झपाट्याने वाढ झाल्याने ‘या’ राज्याने लॉकडाऊन केला अधिक कडक

पंचनामे होईस्तोवर निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना तातडीची मदत रोखीने द्या : देवेंद्र फडणवीस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!