Share

यवतमाळात कापसाच्या दरावरून शेतकरी संतप्त

Published On: 

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आज शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. कापसाचे भाव अचानक 500 रुपयांनी गडगडल्याने शेतकरी संतप्त झाले होते. शेतकऱ्यांनी यार्डाबाहेर पडून रस्ता रोखून धरत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. गेल्या काही दिवसांपासून कापसाला 5200 रुपयांवर क्विंटलप्रमाणे भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात कापसाची आवक घाटंजीतील स्व. सुरेशबाबू लोणकर कापूस मार्केट यार्ड मध्ये झाली.

मात्र आज अचानक या भावात 500 रुपयांची घसरण होऊन 3700 रुपये भाव व्यापाऱ्यांनी केला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांवर अन्याय का, शेतकऱ्यांची लूट थांबवा अशा घोषणा देत सामूहिकरीत्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले.

त्यानंतर घाटंजीतील कापूस खरेदी बंद करण्यात आली. व्यापाऱ्यांनी संघटितपणे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी भाव पाडले असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!