🕒 1 min read
मुंबई : जगभरात तब्बल १०० देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूपासून बचावासाठी भारताने भारताने जगापासून अलिप्त होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बुधवारी (ता.11) सर्व देशांचे व्हिसा रद्द केले आहेत. हे व्हिसा येत्या 15 एप्रिलपर्यंत रद्द असणार आहेत. शिवाय, व्हिसा फ्री देशांतली ये-जा सुद्धा 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. म्हणजे जगातील कुणीही व्यक्ती आता कोरोनामुळे भारतात येऊ शकणार नाही.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना विषाणूची आतापर्यंत 60 प्रकरणं समोर आली आहेत. तर परदेशातून येणाऱ्या जवळपास 10 लाखापेक्षा जास्त जणांची तपासणी करण्यात आली आहे. परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. भारतात दररोज सरासरी 10 लाख परदेशी लोक येतात.
त्यमुळे खबरदारीचा उपाय म्हणून सामान्य परदेशीयांनाही भारतात येण्यास मनाई करण्यात आली आहे. उद्या रात्री 12 पासून परदेशीयांवर हे निर्बंध घालण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त जर कुणी भारतीय व्यक्ती भारतात परत येऊ इच्छित असेल तर त्याला त्याआधी संपूर्ण तपासणी करवून घेत 14 दिवसांपर्यंत त्याला निरिक्षणाखाली राहावं लागणार आहे. मात्र, राजनैतिक, संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिकारी यांना या आदेशातून वगळण्यात आलं आहे.
त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनासंबधी काही मार्गदर्शक तत्त्वे जरी केली आहेत. यात 13 मार्चपर्यंत जारी करण्यात आलेल्या सर्व व्हिसा आणि ई-व्हिसाला रद्द करण्यात आलं आहे. हे व्हिसा 15 एप्रिलपर्यंच रद्द राहतील. पण, संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, डिप्लोमॅट, रोजगार, प्रोजेक्ट व्हिसासह इतर शासकीय अधिकाऱ्यांना भारतात प्रवेश असेल.
जे परदेशी नागरिक सध्या भारतात आहे, त्यांचा व्हिसा जारी राहील. जर त्यांना काउन्सलर अॅक्सेसची गरज असेल किंवा त्यांना त्याच्या व्हिसाची मुदत वाढवायची असेल तर त्यांनी FRRO ला संपर्क करायचा आहे. OCI कार्ड होल्डर्सला जो मोफत व्हिसा ट्रॅव्हलचा फायदा मिळत होता. त्यालाही 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आलं आहे.
चीन-इटली-इराण-कोरिया-स्पेन-जर्मनीसह इतर सर्व देशांची यात्रा करुन परतणाऱ्या भारतीयांची स्क्रिनिंग केली जाईल. यांना 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल. वैद्यकीय तपासणीनंतरच भू-सीमेपासून ते आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत प्रवेश मिळू शकेल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
