नवी दिल्लीः अमेरिकेतील फोर्ड मोटर कंपनी आणि महिंद्र अॅण्ड महिंद्र या कंपन्यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये भागीदारी करार केला होता. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ही भागीदारी प्रत्यक्षात येणार होती. मात्र आता आपापाल्या स्वतंत्र व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहेत त्यामुळे कंपन्यांकडून हि भागीदारी रद्द करण्यात आली असल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली आहे.
दोन कंपन्यांमधील भागीदारीचा बेत संपुष्टात आला असला तरी भारतात स्वतंत्ररीत्या व्यवसाय सुरूच राहील, असे फोर्ड मोटरने सांगितले आहे. त्याचवेळी आपल्या नव्या वाहनांच्या उत्पादनावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे महिंद्र अॅण्ड महिंद्रने सांगितले आहे. महिंद्र अॅण्ड महिंद्र एसयूव्ही प्रकारच्या वाहनांच्या निर्मितीवर तसेच विजेवरील वाहनांच्या निर्मितीवरही लक्ष केंद्रित करणार आहे.
तर प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. आता सरकारनेही इलेक्ट्रिक कारच्या विक्रीला चालना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा अधिक विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर आपापल्या एसयूव्ही प्रकारच्या वाहनांच्या निर्मितीवर लक्ष देणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- सकाळी मोफत कोरोना लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी
- ‘धोनीचं टी 20 मध्ये काहीच योगदान नाही ‘या ‘खेळाडूची जहरी टीका
- नामांतर हा कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही, आमचा नामांतराला विरोधच – अशोक चव्हाण
- आजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील – नरेंद्र मोदी
- लक्षात येतेय का थयथयाटाचे कारण? भाजप नेत्याचा राऊतांवर हल्लाबोल

