टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी महाविद्यालयाच्या मैदानातील सुमारे वीस ते पंचवीस झाडे कापली आहेत. येत्या गुरुवारी मोदी यांची सभा स. प. विद्यालयाच्या मैदानात होणार आहे. मैदानाच्या समोरच्या बाजूला व्यासपीठ उभारण्याचे काम सुरु आहे. अशी वीस ते पंचवीस झाडे तोडण्यात आली आहेत.
14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुण्यात आली होती. यात्रेच्या निमित्ताने सिंहगड रस्त्यावरील झाडे तोडण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनीही त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करू असे आश्वासन दिले होते. मात्र त्याचे पुढे काय झाले हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
याबाबत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन म्हणाले, व्यासपीठाचा जवळ सोळा झाडे होती. त्यातील बहुतेक झाडे बाभळीची होती. महापालिकेची परवानगी घेऊन ती कापण्यात आली आहेत. दोन झाडे तशीच आहेत व एक झाड पावसामुळे पडले आहे यात काहीही चुकीचे नाही.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1184011550505361408?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1184009558739435520?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

