मुंबई : फेसबुक पाठोपाठ आता इक्विटी फर्म सिल्वर लेक यांनीही रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. सिल्वर लेकने तब्बल 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक करून जिओमध्ये 1.15 टक्के भागीदारी घेणार आहे.
याआधी जगभरातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुक कंपनीने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्के भागीदारी घेत 43,574 कोटी रुपये गुंतवणूक केल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता इक्विटी फर्म सिल्वर लेक यांनीही यामध्ये गुंतवणूक करत यामध्ये सहभाग घेतला आहे.
सिल्वर लेक फर्म ही टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर नावाजलेली फर्म आहे. जगभरात सुमारे 43 अरब डॉलर्सची संपत्ती असून जवळपास जवळपास 100 गुंतवणूकी आणि ऑपरेटिंग व्यावसायिकांची टीम आहे. याआधी, सिल्व्हर लेकने अलिबाबा ग्रूप, एअरबीएनबी, डेल, दीदी चकिंग, हायला मोबाइल, अँट फायनान्शियल, एल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटरमध्येही गुंतवणूक केली आहे.
रिलायन्सच्या डिजिटल व्यवसायातील मोठा प्लॅटफॉर्म हा जिओचा आहे. रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेड ही जिओ प्लॅफॉर्ममधील कंपनी आहे. याशिवाय माय जियो, जिओ टीव्ही, जियो सिनेमा, जिओ न्यूज आणि जिओ सावन. एवढेच नव्हे तर रिलायन्स या कंपनी अंतर्गत आपले शिक्षण, आरोग्य सेवा आणि कृषी डिजिटल सेवा देखील देते.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने आज जाहीर केले की, सिल्व्हर लेक जियो प्लॅटफॉर्मवर 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या गुंतवणूकीने जिओ प्लॅटफॉर्मला इक्विटीमध्ये 4.90 लाख कोटी रुपये आणि 5.15 लाख कोटी रुपयांचे एंटरप्राइझ मूल्य दिले आहे, असे आरआयएल आणि जिओ एक संयुक्त निवेदनात सोमवारी सांगितले.


