Share

सांगली-कोल्हापूरवरचे पुराचे विघ्न टळले!

Published On: 

कोल्हापूर : सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर जरी कमी असला तरी सर्व धरणं, तलाव, ओढे ओसंडून वाहत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातच पंचगंगेने धोका पातळी ओलांडल्यानंतर जिल्यातील पूरपरिस्थिती हि पुन्हा महापुरासारखी होताना दिसत होती, मात्र त्यानंतर पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.

गेल्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी व सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पंचगंगा व कृष्णा या नद्यांमधील पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत होती. सांगली जिल्ह्यासह कोल्हापुर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे पुन्हा महापूर येणार अशी भीती नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती.

सुशांतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?

मात्र, गेल्या २ दिवसात पावसाचा जोर ओसरल्याने आता नदी पातळीमध्ये काहीशी घट होण्यास सुरुवात झाली आहे. तर, कोयना धरणाच्या सहा वक्री दरवाज्यांमधून होणारा विसर्ग आता बंद करण्यात आला आहे. सद्या फक्त पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून धरणात ९१.६३ टीएमसी इतका पाणीसाठा असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने  दिली आहे.

तुकाराम मुंढेंचा धडाका : नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता ‘कोव्हिड हॉस्पीटल्स’

सांगली-कोल्हापूरमध्ये निर्माण होणाऱ्या नद्यांच्या फुगवट्यामुळे पुराची परिस्थिती उद्भवते. पंचगंगा व कृष्णा या नद्यांचे पाणी पुढे संगम होऊन कर्नाटकात जाते. कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये करण्यात आलेल्या वाढीमुळे कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे, कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून वेळीच पाण्याचा अतिरिक्त विसर्ग करणे हे महत्वाचे असते. यावेळी तब्बल अडीच लाख क्युसेक वेगापर्यंत अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता.

गर्दी टाळा, घरीच ‘बाप्पा’चे विसर्जन करा!महापौर संदीप जोशी यांचे कळकळीचे आवाहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!