उदगीर : वाढवणा (ता.उदगीर) येथून जवळ असलेल्या तिरु मध्यम प्रकल्प शंकर टक्के भरला आहे.सातत्याने पाऊस सुरूच असून प्रकल्पात येणाऱ्या पाण्याचा ओघ सुरूच आहे त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने गुरुवारी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले आहेत.
आज शुक्रवारी (ता.1) सकाळी २ दरवाजे पुर्ण आणि १ आर्धा दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असुन तेरु नदी काठच्या गावांना प्रशासना तर्फे सर्व माध्यमातून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.पाण्याचा ओघ असाच वाढला तर आजून दरवाजे उघडण्यात येईल असे प्रशासना तर्फे कळविण्यात आले आहे.
गेल्या चार वर्षात यावर्षी पहिल्यांदाच हा प्रकल्प 100 टक्के भरला आहे. त्यामुळे या भागातील पाण्याची सोय झाली आहे. परतीच्या पावसाने यावर्षी या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांना जीवदान मिळाल्याचे चित्र आहे.
तिरु नदी काठच्या गावांना धरणाच्या पाण्याचा विसर्गाची कल्पना देण्यात आली असून सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190190566736162816?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190190271394238464?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

