Share

मच्छीमार कोळी समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आठवले

Published On: 

विशाखापट्टणम : देशात 7 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेशात मच्छीमारी व्यवसायात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती-जमातीचे लोक आहेत. मच्छिमार जमात ही आजही शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहे. महाराष्ट्रात मच्छीमार महादेव कोळी समाज अनुसूचित जमाती मध्ये असताना त्यांना एसबीसी विशेष मागास प्रवर्गमध्ये टाकले आहे. त्यांची ही मागणी आहे की महादेव कोळी समाजाचा एस.टी प्रवर्गात पुन्हा समावेश करावा.

आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांतील मच्छिमार कोळी समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा द्यावी अशी मागणी होत आहे. या मागणीच्या पुर्ततेसाठी आपण केंद्र सरकार तर्फे प्रयत्न करून मच्छीमार कोळी समाजाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशातील मच्छीमार समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारतर्फे केंद्र सरकारला पाठवा. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालायतर्फे आपण मच्छीमार समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. विशाखापट्टणम येथील मच्छीमार कोळी समाज हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात रामदास आठवले बोलत होते.

देशभरातील मच्छीमार समाजाच्या विकासासाठी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी या समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यास राज्य सरकार तर्फे अभ्यास आयोग नेमून राज्य सरकारने मच्छिमार समाजाला अनुसूचित जाती किंवा जमातीचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला पाहिजे. मच्छीमार समाजाला निसर्ग आणि आर्थिक संकटाशी मुकाबला करावा लागत आहे. त्यांच्या मच्छीमार बोटींचा प्रश्न,त्यांना मच्छीमार व्यावसाया संबंधित असलेल्या अडचणी सोडविण्याबाबत मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्याबाबत केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले. यावेळी मच्छीमार समाजातर्फे आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!