Share

धक्कादायक ! प्लाझमा थेरपी दिलेला लीलावतील पहिला रुग्ण दगावला

Published On: 

मुंबई :  मुंबईतून एक धक्कदायक वृत्त समोर आले आहे. प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू  झाला आहे. मुंबईत करोनाबाधित रुग्णांवर प्लाझमा थेरपी प्रयोग प्रथमच शनिवारी लीलावती रुग्णालयातील ५२ वर्षीय रुग्णावर करण्यात आला होता.  मात्र  दुर्दैवाने या   रुग्णाचा मृत्यू झाला  आहे.

२० एप्रिलला ताप, सर्दी आणि फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने ५२ वर्षीय रुग्णाला  वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चाचण्यांमध्ये त्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर या रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवरही ठेवण्यात आलं होत.

तर केंद्र सरकारकडून आणि महापालिकेकडून  परवानगी मिळताचं रुग्णालयानं  नायर रुग्णालयात करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांनी दान केलेले प्लाझमा लीलावती रुग्णालयाला देण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्या रुग्णावर पहिली प्लाझमा थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. आज अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारीचं प्लाझमाचा वापर कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी करत असल्याची माहिती दिली होती. तर इथून पुढे नायर रुग्णालय आणि पुण्यातही प्लाझमा थेरपीला सुरवात करणार आहे, असे टोपे म्हणाले होते. मात्र पहिल्या रुग्णाच्या मृत्यूमुळे लीलावतील प्लाझमा प्रयोग हा सध्या अयशस्वी झाला आहे, असचं म्हणाव लागेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!