Share

Breaking : भारतात कोरोना व्हायरसमुळे एकाचा मृत्यू…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली  : जगभरात ‘कोरोना’ची दहशत पसरली असून आता भारतात देखील त्याने शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात पुण्यात विषाणूचा संसर्ग झाल्याचे काही रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुणे शहर व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केला. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतात कोरोना व्हायरसमुळे पहिला बळी गेल्याची माहिती मिळत आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील ७६ वर्षीय स्थानिक व्यक्तीचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण दुबईहून कर्नाटकात परतला होता. दरम्यान, केंद्रीय आरोग्या मंत्रालयाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

भारतात कोरोनाव्हायरसचा धोका आता अधिकच वाढला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 60 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 60 झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. ANI ने याबाबत ट्विट केलं आहे.

दरम्यान, जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस महाराष्ट्रात पोहचल्यानंतर आता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हायरस पसरू नये याची काळजी राज्यसरकार सर्वतोपरी घेत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी एकीकडे बैठका घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे अधिवेशन काळात विधिमंडळात होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा सरसावल्या आहेत.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!