टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. मात्र मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या पराभवामुळे शेकापचे जयंत पाटील यांचे संतुलन बिघडल्याचे पहायला मिळाले होते.
पाटील यांनी चक्क लोकसत्ताचे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांच्या कानशिलात लगावली होती. आता या प्रकरणाने नवे वळण घेतले असून पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयंत पाटील आणि सुभाष पाटील या दोन आमदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रेसरुमध्ये हा प्रकार घडला. निवडणूक केंद्रात पत्रकाराला मारहाण झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. लोकसत्तामध्ये हर्षद कशाळकर यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या बातम्या लिहिल्या होत्या, त्यातील काही बातम्यांचा राग मनात ठेऊन त्यांनी हा प्रकार केल्याचं कळतंय.
दरम्यान,पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी द्या, अशी मागणी जयंत पाटलांनी केली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांना अपेक्षिल लीड देऊ शकले नाहीत, या उद्वेगातून जयंत पाटलांनी ही मारहाण केल्याचं बोललं जातंय.याच प्रकरणात बेकायदेशीरपणे मतमोजणी केंद्रात घुसल्याप्रकरणी या मुजोर आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील पत्रकारांनी तसेच पत्रकार संघटनांनी या कृत्याचा जोरदार निषेध केला आहे, तसेच कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
