ऑस्ट्रेलिया : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या सिडनीच्या मैदानावर भारताचा 66 धावांनी पराभव झाला. त्यानंतर भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने भारतीय संघाला पर्यायाने कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का दिलाय. संघात ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’, अशा स्पष्ट शब्दात हार्दिक पांड्याने निवड समितीला आणि कर्णधार कोहलीला सांगितलं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याच्या बोलिंगची कमी भारतीय संघाला मोठ्या प्रकर्षाने जाणवली. मागील वर्षापासून पाठीच्या आजारामुळे हार्दिक बोलिंग करु शकत नाही. संपूर्ण आयपीएलच्या हंगामात त्याने मुंबईकडून केवळ बॅटिंग केली. सध्या तो त्याच्या बोलिंग अॅक्शनवर तसंच बोलिंग स्पीडवर काम करत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकच्या बोलिंगची उणीव भासल्याचं स्वत: कर्णधार कोहलीने मान्य केलं. अशातच बोलिंगचा सहाव्या पर्यायासाठी भारतीय संघाने दुसऱ्या ऑलराऊंडरचा शोध घेणे आवश्यक आहे, असं हार्दिक पांड्या म्हणाला.
भारतीय संघाला असा खेळाडू हवा जो भारतीय संघाकडून खेळलेला आहे. पाच बोलर्सला घेऊन खेळणे मुश्किल असू शकतं कारण जर कोणत्याही एका बोलर्सचा दिवस खराब असेल तर त्याच्या ओव्हर्स भरून काढणारं दुसरं कुणीही नसतं.
अशा परिस्थितीत संघाला असा पर्याय कोण देऊ शकतं, असा प्रश्न हार्दिकला विचारल्यावर त्याने त्याचा भाऊ क्रुणालचं नाव घेतलं. हार्दिक म्हणाला, “निवड समितीने क्रुणालच्या नावाचा समावेश करायला हरकत नाही. भारतीय संघाकडे दुसरे पर्याय असतील तर त्यांचाही त्यांनी विचार करायला हवा. पण नसतील तर क्रुणालचा पर्याय आहे”.
या मॅचमध्ये हार्दिक पांड्याने 90 रनची खेळी करत विक्रमाला गवसणी घातली. जगभरात सगळ्यात जलद एक हजार रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पांड्या पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पांड्याने 857 बॉलमध्ये एक हजार रन पूर्ण केले. हार्दिक पांड्याने हा रेकॉर्ड करताना जॉस बटलरला मागे टाकलं. बटलरने 860 बॉलमध्ये एक हजार रन केले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा’
- ‘रुक! अभी तय नहीं हुआ हैं…, किसके घर जाना हैं’, ईडी कारवाईवर राऊतांचा भाजप सरकारला टोला
- ‘ईडीची कारवाई ही ऑपरेशन कमळची सुरुवात’
- पंतप्रधान मोदी पुण्यात येणार मात्र ‘छोटे भाई’ उद्धव ठाकरे राहणार अनुपस्थित !
- प्रताप सरनाईक यांच्या ईडी कारवाईवर, सचिन सावंत यांचा फडणवीसांना थेट सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

