टीम महाराष्ट्र देशा : बहुप्रतीक्षित असलेला मान्सून अखेर श्रीलंकेत दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या ६ ते ७ दिवसात मान्सून भारताच्या दिशेने येणार आहे. सोमवारी श्रीलंकेत मान्सून दाखल झाल्यामुळे 9 ते 10 तारखेपर्यंत मान्सून भारतात प्रवेश करेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.
यावेळेस उष्णतेची दाहकता तुलनेने जास्त होती. तसेच वारे देखील मधल्या काळात मंदावले होते. त्यामुळे २५ मे पर्यंत श्रीलंकेमध्ये दाखल होणारा मान्सून हा यावेळेस आठवडाभर उशिराने दाखल झाला आहे. एकूणच मान्सूनची वाटचाल 8 ते 10 दिवस उशिराने होत आहे. श्रीलंकेनंतर आता काही दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
तसेच ‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार येत्या ४८ तासात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील 48 तास हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते. मात्र पुर्वोत्तर अरबी समुद्रात गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टी परिसरात अनुकूल वातारवरण तयार झालं नाही, त्यामुळे मुंबईत मान्सून पूर्व पावसाने दांडी मारली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
