Share

अखेर सांगलीतील ४०० वर्ष जुन्या वटवृक्ष वाचले! आदित्य ठाकरेंनी मानले गडकरींचे आभार

Published On: 

सांगली: रत्नागिरी-नागपूर या महत्वाच्या महामार्गाचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, यात अनेक वृक्षांच्या कत्तली होत असल्या तरी तब्बल ४०० वर्ष जुन्या असणाऱ्या वटवृक्षाला वाचविण्यात पर्यावरणप्रेमींसह ग्रामस्थ आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवाराला यश आले आहे.

महामार्गाची रचना थोडीशी बदलून बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) आणि दिलीप बिल्डकॉन या रस्ता बांधणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय गेल्यावर त्यांनी तात्काळ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. अखेर काल (22 जुलै) नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून भोसेच्या वटवृक्षप्रकरणी मार्ग काढण्याचे आदेश एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाले.

सभापती व्यंकय्या नायडू यांनी जे राज्यघटनेत नाही त्यावर फक्त आक्षेप घेतला – उदयनराजे

यानंतर, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. “एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी इथे भेट देऊन 400 वर्ष जुन्या वटवृक्षाची पाहणी केली असं मला समजलं. त्यानंतर महामार्गावरील बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय झाला. त्यामुळे हे वृक्ष वाचलं आहे. माझ्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मी आभार मानतो. ज्यांनी हा मुद्दा निदर्शनास आणला आणि हे वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचेही ही आभार मानतो,” अशा शब्दांत त्यांनी आभार मानले आहेत.

दाखले मागणाऱ्यांनी शिकवू नये, आधी बाळासाहेब ठाकरे मोठे की छत्रपती शिवाजी महाराज हे सांगावं – उदयनराजे

400 वर्षांहून अधिक जुने हे झाड असल्याने त्याच्या बचावासाठी ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी सरसावले होते. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवाराने वटवृक्ष तसाच ठेवून त्याच्या शेजारुन रस्ता करावा, अशी मागणी करत आंदोलनाची हाक दिली होती. या महाकाय वटवृक्षानजीक पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत सोशल डिस्टन्स ठेवत प्रतिकात्मक ‘चिपको आंदोलन’ही केलं. पर्यायी मार्गाने रस्ता करुन हा वटवृक्ष वाचवावा अशी मागणी त्यांनी केली.

राम मंदिराचे बांधकाम सुरु होताच करोना व्हायरस नष्ट होईल,भाजपनेता बरळला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!