Share

रुग्णसेवा न देणाऱ्या दवाखान्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करा – दत्तात्रय भरणे

Published On: 

सोलापूर : रुग्णसेवा न देणार्या खासगी दवाखान्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज खासगी दवाखान्यांना भेट देवून रुग्ण् सेवा देतात की नाही याची पाहणी केली. तसेच रुग्ण् व डॉक्टरांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी. शिवशंकर होते.

कोविड-नॉन कोविड रुग्णांची सोय व्हावी, यासाठी खासगी दवाखान्यांना पालकमंत्री भरणे यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. तसेच ज्या दवाखान्यामध्ये अधिसूचित नियामानूसार डॉक्टर , नर्सिग स्टाफ व जिवरक्षक प्रणाली उपलब्ध् नाही अशा दवाखान्यांविरुध्द तातडीने गुन्हा दाखल करु, असे आदेश भरणे यांनी दिले.

जम्मूत कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी घडली एक धक्कादायक घटना

या भेटी दरम्यान उपस्थित डॉक्टर, त्यांच्या वेळा व ओपीडी रजिस्टर या बाबत चौकशी केली. हॉस्पिटलच्या अडचणी समजून घेतल्या. काही खासगी दवाखान्यांनी उत्तम काम केल्याबद्वल अभिनंदन ही केले. सर्व खासगी दवाखान्यातील डॉक्टरांचे सहकार्य अपेक्षित असून सोलापूर कोरोना मुक्त् करण्यासाठी सर्व दवाखान्यांची मदत लागणार आहे. त्यामुळे आपण दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास दवाखान्यावर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

त्यांनी शहरातील जोशी हॉस्पिटल व लॅब , केळकर हॉस्पिटल, मोनार्क हॉस्पिटल, यश क्लीनिक, धांडोरे हॉस्पिटल, उत्कर्ष हॉस्पीटल, सिटी हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, सोलापूर सहकारी रुग्णालय व आश्वनी हॉस्पिटलना भेटी दिल्या.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकित झाले शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे दोन निर्णय

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!