🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : फिफा वर्ल्डकपच्या नॉकआऊट राऊंडला आजपासून सुरूवात होतेय. साखळी सामन्यानंतर अंतिम सोळा संघामध्ये नॉकआऊटचा थरार रंगणार आहे. नॉकआऊटच्या पहिल्याच दिवशी अर्जेंटिना विरूद्ध फ्रान्स आणि पोर्तुगाल विरूद्ध उरूग्वे या तुल्यबळ संघांमध्ये लढत होणार असल्याने, आज पोर्तुगालच्या क्रिस्तीयानो रोनाल्डो आणि अर्जेंटीनाच्या लियोनेल मेसीकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत.
सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मेसीकडून चाहत्यांच्या अनेक अपेक्षा आहेत. नायजेरियाविरुद्ध त्याने यंदाच्या विश्वचषकातील वैयक्तिक पहिला गोल करून सूर गवसल्याचेही संकेत दिले आहेत. क्रोएशियाकडून ०-३ असा पराभव पत्करल्यावर या संघाला खडबडून जाग आली.
आक्रमणात प्रामुख्याने मेसीवरच अवलंबून असलेल्या अर्जेटिनाला गोन्झालो हिगुएन आणि सर्जिओ अग्युरो यांच्याकडूनही अपेक्षा आहेत. तसेच मागील लढतीत चमकलेला मार्कोस रोजोवरही चाहत्यांचे लक्ष आहे.
We didn't have any football yesterday. It was rubbish.
The good news? We're BACK! #FRAARG // #URUPOR // #WorldCup pic.twitter.com/paIsIhBr9Z
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) June 30, 2018


