🕒 1 min read
लातूर : आज आठ मार्च जागतिक महिला दिन, आजच्या दिवशी संपूर्ण देशभरात कर्तृत्वान महिलांना गौरविण्यात येते. या उलट लातूर येथे महिला दिनी जिल्हा परिषद शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक महिलेला लाचलुचपत विभागाने तीन हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडत कारवाई केली. या कारवाई नंतर सर्वत्र या घटनेची चर्चा होती.
आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. या दिवशी कर्तृत्वान महिलांना गौरविण्यात येते. या महिला दिनी लातूर येथे एक वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक पथकांच्या झाळ्यात अडकली आहे. एका निवृत्त कर्मचाऱ्याचे बिल लातूर ग्रामपंचायतीला पाठवण्यासाठी त्यांनी ३००० रु यांची लाच मागितल्याचे कळाले.
या कारवाईमुळे जागतिक महिला दिनाला गालबोट लागल्याचे बोलल्या जात आहे. या महिलेला लाच द्यायची इच्छा नसल्यामुळे संबंधित व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकरणातील महिला अधिकारी सध्या लाचलुचपत पथकाच्या ताब्यात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ’, दरेकरांची अर्थसंकल्पावरून टीका
- अर्थसंकल्पातून नाराज बंजारा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न?
- पोहरादेवीच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी देणार-अजित पवार
- उस्मानाबाद मेडिकल कॉलेज; घोषणा केली भाजपने, पूर्ण केली राष्ट्रवादीने!
- मोठी बातमी! महिलांच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, अजित पवारांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
