Share

FB Live : डॉक्टरांनी ओपीडी सुरु करावी, जनतेला तुमची गरज आहे : सुप्रिया सुळे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी आज पुन्हा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांना आपले खाजगी रुग्णालय-दवाखाने उघडण्याचे आवाहन केले. जनतेला तुमची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. तर यावेळी कौटुंबिक हिंसाचार या संवेदशील विषयावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले.

त्या म्हणाल्या की, लॉकडाउनमुळे सध्या अनेक कुटुंबांमध्ये चिंता वाढत चालली आहे. आर्थिक अडचणी आहेत, पगार वेळवर होणार की नाही असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर कसा मार्ग काढता येईल. महिलांविरोधात हिंसाचार सुरुच आहे. करोनाचं संकट संपल्यानंतर बेरोजगारी वाढणार आहे. महिलांसमोर आव्हान असणार आहेत. घरगुती हिंसाचारासंबंधी अनेक कायदे आहेत. आता नवीन कायदा करण्याची वेळ नाही. समुपदेशनाच्या मदतीने संसार वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सुप्रिया सुळे यांच्यासमोर फेसबुकच्या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. पीएमसी बँकेसंदर्भात एका महिलेने प्रश्न विचारला. त्यावर पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत माझे बोलणे झाले आहे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याशी सुद्धा या मुद्दावर चर्चा केली आहे असे त्या म्हणाल्या.

तर डॉक्टरांना आपले खाजगी रुग्णालय-दवाखाने उघडण्याचे आवाहन केले. आम्ही सर्व सहकार्य करु. मास्क, पीपीई किटस पुरवण्याचा प्रयत्न करु. रुग्णांना तुमची गरज आहे. त्यामुळे पुढे येऊन आपल्या ओपीडी उघडा असे सुळे म्हणाल्या.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!