🕒 1 min read
धुळे : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने १० हजार कोटींची तरतूद केली आहे. पंचनामे झालेल्या भागातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळेल. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.
कृषी मंत्री दादा भुसे यांनी धुळे शहरातील कृषी महाविद्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, राज्यात आलेल्या आपत्तीच्या निवारणासाठी शासनाने आतापर्यंत १५ हजार कोटींचा निधी दिला आहे. आता १० हजार कोटी रुपयांचा निधी भरपाईसाठी देण्यात येत आहे. जुन-जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार नुकसान भरपाईचे वाटप सुरु करण्यात आले आहे.
दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळी तोंडावर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना फळ आणि पीक विमा योजना मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाला पत्र व्यवहार केला आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.
१४८ कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे -राज्यातील सुमारे २ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या कंपन्यांकडे पहिल्या हप्त्याची रक्कम जमा आहे. तसेच राज्य शासनाने ऑक्टोबर-२०२१ मध्ये १४८ कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे आहे. केंद्र शासनानेही त्यांच्या हिस्सा विमा कंपन्यांकडे द्यावा, अशी मागणी करणारे पत्र कृषीमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना दिले आहे. तातडीने याबाबत कार्यवाही केल्यास दिवाळीपूर्वी फळपीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकेल, असे या पत्रात नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही – सामंत
- मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही खरी बातमी असावी; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन भातखळांची टीका
- आरएसएस विरोधात वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
- अखिलेश यादव आणि प्रियंका गांधींची विमानामध्ये भेट; नेमके काय झाली चर्चा?
- नाशिकमध्ये यंदा शिवसेनाच सत्तास्थानी असणार; संजय राऊतांचा विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
