Share

औरंगाबादमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले….

Published On: 

पैठण / किरण काळे –  शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवले असतानाही  कारखानदार आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आले नसल्याने आंदोलकांनी सोमवार दि १३ रोजी पाटेगाव फाट्यावर वाहने अडवली आहेत.

ऊसाला ३१०० रूपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असुन भाव जाहीर होईपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा स्पष्ट इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालावलकर यांनी दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला एक रकमी ३१०० रूपये भाव देण्यात यावा. थकीत रक्कम व्याजासह देण्यात यावी , शेतकऱ्यांना हमीपत्र दिल्यानंतर  कारखान्याने दिलेल्या हमी पत्रावर शेतकऱ्यांना खत औषध बेणे यासाठी तरतूद करण्यात यावी,  गट ऑफीसमध्ये भाव फलक लावण्यात यावे आदी मागण्या शेतकरी संघटनेने केलेल्या आहेत. यावेळी ऊसाचे २५० ते ३०० वाहने यामध्ये बैल टायर गाडी, ट्रँक्टर, ट्रक व २२५ खाजगी वाहने रास्तारोको आंदोलनामुळे पैठण – शेवगाव रोडवरील जागेवर उभी होती.

युवा अध्यक्ष अमर कदम,  संतोष सूर्यवंशी,गोकुळ रावस, पुरूषोत्तम खिस्ती, चंद्रकांत झारगड, माऊली मुळे पवन शिसोदे, अनिल चपडे, ज्ञानेश्वर जाधव, पुणे शहर अध्यक्ष दुष्यंत जगताप, सोशल मिडीया सेल आनंद जाधव, विद्यार्थी आघाडी राजपाल लिंबीकाई, शुभम सोनवल, वसंत चोरमले, नवनाथ मुळे, अमोल कानडे, राजेंद्र झारगड, नवनाथ कानडे, मोहन खताळ, विष्णु डुकळे, खलील पठाण, गणेश खेडकर, रवि खाडे, बाळासाहेब दसपुते, मोहन करकसे, कृष्णा काळे, मनसुर भाई, सिराज भाई, लवांदे सर आदींची उपस्थिती होते.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!