Share

शेतकऱ्यांना पिकविमा त्वरित दयावा,अन्यथा उद्रेक अटळ;सामाजिक संघटनांचा इशारा 

Published On: 

पारनेर – पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिकविमा योजनेत २०१८ मध्ये फिचर जनरल इन्शुअरन्स कंपनी च्या माध्यमातून पिकविमा उतरवला. मात्र भीषण परीस्थिती असतानाहि पिकविमा मिळाला नाहि. शेतकरी विमाकवच घेत असताना विम्याचे पैसे देणे कंपनीला बंधनकारक आहे परंतु कंपनी टाळाटाळ करत आहे. आज २०२० आहे तरीही विमा मिळत नाही.

शेतकरी आत्महत्या होत असताना जर कंपनी ने जर नियम धाब्यावर बसवुन जर शेतकर्यांची पिळवणूक करत असेल तर मात्र हे सहन केले जाणार नाही. शेतकरी हे त्याच्या हक्काचेच मागत आहे. कंपनीने त्वरित पिकविमा दयावा. अन्यथा यापुढे सबंधित कंपनीला तालुक्यात पाऊल ठेउन दिले जाणार नाही. शेतकरी बांधवानी आता सघटीत होऊन लढावे लागणार आहे. या लढ्यात तालुक्यातील सर्व पक्ष सामाजिक संघटनानी पुढे यायला हवे त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे अनिल शेटे यानी सांगितले. दुर्लक्ष केले तर मात्र विविध टप्प्यात आंदोलन केले जाईल व अंतिम टप्प्यातील आंदोलन उग्र व आक्रमक स्वरुपाचे असेल.

यासबंधीचे निवेदन सबंधित कंपनी,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,कृषीमंत्री दादा भुसे,राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु,खासदार सुजयदादा विखे,माजी आमदार विजयराव औटी, आमदार निलेशजी लंके,सुजित पाटील झावरे, सभापती प्रशांत गायकवाड, कृषी अधिकारी दरेकर साहेब,ज्योतीताई देवरे तहसिलदार पारनेर , राजेशजी गवळी पोलिस निरीक्षक पारनेर, याना देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो, गोपीचंद पडळकर झाले ट्रोल

..तर पुढच्या निवडणुका एकत्र लढवू, शरद पवारांचे संकेत

#Corona: कोरोनाची लागण झाल्याने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी…

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!