Share

अतिवृष्टीने रायगड जिल्हयातील 95 टक्के भातशेतीचे नुकसान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : रायगड जिल्हयात ऑगस्ट,सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्हयातील 95 टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. जिल्हयात 1लाख 23 हजार हेक्टरवर भाताची लागवड होते. यंदा भातशेतीचे क्षेत्र कमी झाले आणि 95 हजार हेक्टरवरच भाताची लावणी केली गेली.

शुक्रवारी झालेल्या पावसाने उरले-सुरले पीकही नामशेष झाले. भाताचे कोठार असा गौरव प्राप्त झालेल्या रायगडचे यंदाचे भाताचे कोठार मोकळेच राहणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे शेतकरी आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याची भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडं 216 कोटी रुपयांची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने तीन लाख आठ हजार शेतकरी बाधित झाले आहेत तर सुमारे पंधरा हजार घरांची पडझड झाली आहे.

ठाणे, जळगाव, जालना, परभणी, पालघर या जिल्ह्यात कालपासून पाऊस होत आहे. तिकडे नव्याने निर्माण झालेले महा नावाचे चक्रीवादळ दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस पाडण्याची शक्यता आहे. हे वादळ आजपासून पश्चिम-उत्तर दिशेकडे सरकत जाणार आहे. सौराष्ट्रच्या अनेक भागांमध्ये या वादळामुळे पाऊस पडतो आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190537684768309248?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190539682745946112?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!