🕒 1 min read
तुळजापूर -देशावर आलेल्या कोरोना संकटा पार्श्वभूमीवर लावलेल्या लाँकडाऊन मुळे भारतीयांना उपास मारीस सामोरे जावे लागत आहे. हे दृश्य पाहवले न गेल्याने जवळ पैसे नसलेल्या कामठा ता. तुळजापूर येथील एका अल्पभुधारक शेतकऱ्याने आपली दोन ऐकर शेतातील सहा लाख रुपये किमतीची केळी शासनाला भुकेला लोकांना वाटप करण्यासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशावर संकट आले कि पहिला धावतो तो शेतकरी हे कृतीद्वारे दाखवुन माणुसकिचे दर्शन घडवले.
तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील विकास रामलिंग पटाडे यांना साडेतीन ऐकर शेती असुन त्यात दोन ऐकर केळी बाग आहे. या बागेस लागवड ते आजपर्यत म्हणजे माल हाती येईपर्यंत अडीच लाख खर्च आला असून आता यातुन उत्पन्न मिवण्यास सुरुवात होणार होती . या बागेतून कमीत कमी सहा लाख रुपये उत्पन्न येणार होते असा त्यांचा अंदाज आहे.
माञ कोरोना प्रादुर्भाव सुरु झाला. यात होणारे लोकांच्या हालाखीचे दर्शन टीव्ही वर पाहुन कळवळलेले पटाडे यांना आपण या लोकांना मदतीचा हात देण्याची गरज आहे असे वाटले. परंतु हातात पैसा नाही आता काय करावे या विवेचंनात असतानाच त्यांना केळीची बाग नजरेत आली आणि केळीचा बागेतील माल लोकांना वाटण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
यासाठी केळीच्या बागेतील माल दान करण्याचा निर्णय घेवुन शासनाने तो घेण्याचे आवाहन करणारा व्हीडीओ बनवुन तो समाज माध्यमावर वर टाकला. याची दखल शासन प्रतानिधी तहसिलदार यांनी संपर्क साधला व हा माल नेण्यासाठी वाहनासह बुधवार दि १ रोजी पाठवण्याचा निर्णय घेतला .
सध्या पटाडे यांच्या शेतातील माल वाटण्यासाठी शहरी भागातील मंडळी वाहाने घेवुन येत असुन ते वाटप करीत आहेत. मागील वर्षी पाणीटंचाई व दुष्काळ असल्याने त्यांचा केळीचा बागेला माल आला नाही. यंदा चांगला माल आला तर त्यांनी दान करण्याचा निर्णय केल्याने त्यांचं शेतकऱ्याचे सर्वञ कौतुक होत आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
