मुंबई : फिटनेस, योगा यामुळे परिचित असलेली शिल्पा शेट्टी आता एका वेगळयाच कारणाने चर्चेत आली आहे. तशी ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असतेच, नुकताच तिचा एका व्हिडिओ पाहून चाहत्यांना मात्र आश्चर्य वाटले आहे.
नुकताच शिल्पा शेट्टीने एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ शेअर करत तिने एक मोठी पोस्टही लिहिली आहे. शिल्पाने शेअर केलेला व्हिडीओ जिममधील आहे. या व्हिडीओत शिल्पा केस बांधतांना उभी दिसतेय. त्यानंतर ती वर्कआऊट करू लागते. मात्र केस बांधत असतानाच शिल्पाचा नवा हेअर कट दिसून येतोय. कॅप्शनमध्ये शिल्पाने तिने ‘अंडरकट बझ कट’ केल्याचं म्हंटलंय. शिल्पाचा हा नवा हेअर कट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. तिच्या हेअर कटवर चाहत्यांनी भरपूर मजेदार कमेंट केल्या आहेत. कॅप्शनमध्ये ती म्हणाली’प्रत्येक दिवस विना रिस्क आणि कम्फर्ट झोन बाहेर न येता जगू शकत नाही. मग तो अंडरकट बज कट असो.’ असं लिहीत शिल्पाने तिने मोठ्या हिंमतीने हा हेअर कट केल्याचं म्हंटलं आहे.
https://www.instagram.com/reel/CVKNwgdDPjL/?utm_medium=copy_link
शिल्पाचा नवा हेअर कट पाहून तिचं कौतुक केलंय. तर काहींनी मात्र कमेंट करत तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘ओएमजी शिल्पाजी ये आपने क्या किया..’, ‘तिरुपतिला जावून केस काढले वाटतं आणि वरुन वीग घातलं आहे.’ या व्हिडीओत शिल्पाने तिच्या वर्कआउट बद्दलही सांगितलं आहे. शिल्पा कायमच योगा आणि वर्कआउटचे व्हिडीओ शेअर करत अनेकांना प्रेरणा देत असते. त्यामुळे शिल्पा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाल्याने काहींनी तिचं कौतुक करत हार्ट आणि फायरचे इमोजी ने पसंती दर्शविली.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

