मुंबई : १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपले जीवन संपविल्यामुळे बॉलिवूड मध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली असून चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. अत्यंत प्रभावी व हुशार व्यक्तिमत्व असलेल्या सुशांत ने अचानक मुंबईतील बांद्रामध्ये राहत्या घरी त्याने आपले जीवन संपवले होते.
‘सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करणं कठीण, सरकारवर येऊ शकते कर्ज काढण्याची वेळ’ – मंत्री विजय वडेट्टीवार
यामागील कारण मात्र अस्पष्ट असून पोलीस सर्वच शंका तपासून पाहत आहेत. बॉलिवूड मधील अनेक कलाकारांसह फॅन्स ने सोशल मिडियावर नाराजी व्यक्त करत ज्या कोणामुळे सुशांतला आत्महत्या करावी लागली असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती.
अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलिवूड मध्ये नेपोटीजम होत असून काही बढे अभिनेते व प्रोडक्शन हाऊस हे मुद्दाम टार्गेट करून ठराविक अभिनेता व अभिनेत्रींना डावलत असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर मुंबई पोलिसांनी सर्वच शंका तपासत अनेक बढे व्यक्ती व त्याच्या जवळील व्यक्तींच्या चौकशीला सुरुवात केली होती.
कोविड योद्धे वगळता इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात – विजय वडेट्टीवार
दरम्यान, आता प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांची देखील चौकशी केली जाईल असे ABP माझा च्या वृत्तानुसार समजत आहे. सुशांत सिंह राजपूत ला भंसाळी यांनी दोन मोठ्या चित्रपटासाठी साईन केले होते असे समजत असून, नंतर मात्र प्रोडक्शन हाऊस च्या नाराजीमुळे त्याला काढण्यात आले होते. बाजीराव मस्तानी व रामलीला या दोन चित्रपटांची मुख्य भूमिका त्याला देण्यात आली होती असे देखील समजत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

