Share

‘येत्या महिन्याभरात मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, म्हणून राज्य शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येणार आहे. मात्र वास्तवात या योजनेपासून अनेक कर्जबाजारी शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी येत्या महिन्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी यावर्षी ५८,२४४ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे टार्गेट आहे. त्यामुळे बँकांनी कसलेही आढेवेढे न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसएलबीसीच्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे पीक कर्जाची आवश्यकता असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कर्ज नक्की मिळणार आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

तसेच राज्यातले जेवढे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने पासून वंचित आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस येत्या महिनाभरात मोठी घोषणा करणार आहेत. असे मुनगंटीवार म्हणाले.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!