पुणे : राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीवरून बाहेर पडायला तयार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, फडणवीस रोज कुठे ना कुठे फिरताहेत. त्यांना काय कोरोनाची भीती नाही का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र बाहेर पडतच नाहीत.
भाजप आमदाराची लॉकडाउनमध्ये दारू पार्टी, सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल
आतापर्यंत केवळ दोनवेळा ते मातोश्रीवरुन बाहेर पडले. कोणी मातोश्रीवर गेले तरी त्यांना मुख्यमंत्री त्यांना भेटायला तयार होत नाहीत. यापूर्वी २००४ साली शरद पवार मातोश्रीवर गेले होते. परंतु, गेल्या सहा महिन्यांत शरद पवार यांनी मातोश्रीवर तीन-चार फेऱ्या मारल्या आहेत. त्यांना इतक्या वेळा तिकडे जायला लागू नये असे, वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.
दरम्यान कालच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त लॉकडाऊनवरच बोलतात. त्याच्याशिवाय त्यांना दुसरे काहीच बोलता येत नाही. ते जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून त्यांना राज्यातील इतर समस्यांविषयी काहीच देणे घेणे नाही. उद्धव ठाकरे हे मातोश्री पुरते मुख्यमंत्री आहेत. राज्यात सध्या मुख्यमंत्र्यांचे राज्य नसून अधिकारीचे राज्य करत आहेत, असे गंभीर आरोप भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केला
मुख्यमंत्री मंत्रालयात फिरकलेच नाहीत, सरकार अस्तित्वात आहे की नाही? पंढरपूरला मुख्यमंत्री गेले मात्र त्यांनी मूर्तीला हात लावला का? हार घातला का? प्रसाद घेतला का? हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
फक्त घरी बसून कामं होत नाहीत, मनसेनेही मिसळला राणेंच्या सुरात सूर
महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू, त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही, त्यासाठीच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे, असेही जोरदार टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडले.

