मुंबई : देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. मात्र अनेक नेत्यांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. गोव्यातील सत्ताधारी भाजपाच्या आमदाराने दारु पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सर्व प्रकारामुळे भाजपची चांगलीच नाचक्की झाली असून चौफेर टीका भाजपवर होत आहे.
न्याय्य हक्कासाठी लढू आणि जिंकू सुद्धा ! – खा. संभाजीराजे
या व्हिडिओमध्ये बार्देस तालुक्यातील हळदोणा मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो हे ‘मद्य पार्टीत’ सहभागी झालेले दिसत असून याप्रकरणाची चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.
A BJP MLA from Aldona, Glen Ticlo enjoying a party, at a time when the State is witnessing rising #COVID19 cases.
Will the @goacm initiate necessary action against the MLA & get him arrested for flouting the norms under the pandemic act?. pic.twitter.com/jtGwbZSAhC
— Goa Congress (@INCGoa) July 6, 2020
दरम्यान, कालच मिरा भाईंदरमधील ‘कोरोना’ग्रस्त आमदार गीता जैन यांनी घरी वाढदिवस साजरा करतानाचे फोटो समोर आले आहेत. होम क्वारंटाईन असताना त्यांनी पतीसह केक कापून सेलिब्रेशन केले.
5 जुलै रोजी गीता जैन यांचा वाढदिवस होता. दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांनी केक कापून घरात एकमेकांबरोबर वाढदिवस साजरा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले असून अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत.
तर तिकडे वैजापूर मध्ये देखील काहीसा असाच प्रकार समोर आला आहे. कोरोना मुक्त झालेल्या एमआयएम नेते आणि माजी उपनगराध्यक्षांच्या समर्थकांनी काल रविवारी रात्री वैजापुरात चक्क मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सोशल डिस्टंसिंगचा अक्षरशः धुराळा उडाला. वैजापूर पोलिसांनी या प्रकरणी तब्बल शेकडो जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
वैजापुरचे माजी उपनगरअध्यक्ष व एमआयएमचे नेते अखिल शेख यांना कोरोनाची लागण झाली होती. शहरात उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले. ते शहरात येणार असल्याने समर्थकांनी स्वागताची जंगी तयारी केली. रात्री ८ वाजेच्या सुमारास वैजापुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांचे आगमन होताच शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारला गराडा घातला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी सुरू केली.
‘या’ मालिकेतील कलाकाराला झाली कोरोनाची लागण; थांबवलं शूटिंग
एका बाजूला सर्वसामान्य जनतेला सरकार नियम पाळायला सांगत आहे मग या नेत्यांवर मेहेरबानी का करण्यात येत आहे असा सवाल उपस्थित झाला आहे. जर नेते असं बेजबाबदारपणे वागणार असतील तर सर्वसामन्यांनीच फक्त नियम पाळावे का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

