Share

तो फोटो इटलीच्या पंतप्रधानांचा नाही तर ब्राजीलच्या अध्यक्षांचा; संदर्भही चुकीचा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक पोस्ट व्हायरल झाली आहे . या पोस्ट्सद्वारे असा दावा केला जात आहे की चित्रात दर्शविलेली व्यक्ती इटालियन पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे आहेत , जे कोरोनोव्हायरस साथीच्या आजारामुळे आपल्या देशातील लोक मरत आहेत म्हणून ते भावूक आणि असहायपणे रडत आहेत.जे लोक अजुनही कोरोनो व्हायरसच्या धोक्याला गंभीरपणे घेत नाहीत अश्या लोकांना या व्हायरल फोटोद्वारे विषयाचं गांभीर्य समजून घेण्याच आवाहन केलं जात आहे.

या पोस्टचे शीर्षक असे लिहिले आहे की,’ज्यांना कोरोना विषाणू (कोविड -१९)) च गांभीर्य नाही, तर हा फोटो पुन्हा पहा आणि विचार करा… हे  इटलीचे पंतप्रधान ज्युसेप्पी कॉन्टे आहेत. आपल्या देशातील मरण पावलेल्या लोकांना बघून हे आपले अश्रू  थांबवू शकत नाही! एखाद्या देशाचे पंतप्रधान सत्तेत असूनही आपल्या मरणासन्न माणसांना पाहून काहीही करण्यास असमर्थ आहेत… ही माणसाची असहायता आहे. ”

आता ‘फॅक्ट क्रीसेंन्डो’ या तथ्य संशोधन संकेत स्थळाने याबाबत छाननी केली असून यातून वेगळीच माहिती समोर आली आहे. त्यांनी सदर फोटो  Google रिव्हर्स इमेज सर्च करुन या फोटोचा स्क्रीनशॉट घेऊन तपास सुरू केला, परिणामी असे कळले की फोटोत इटालियन पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे नाही, तर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष, जैर बोलसनोरो आहेत.

१४  डिसेंबर २०१९ रोजी podar340 नावाच्या वेबसाइटने हा फोटो प्रकाशित केला. माहितीनुसार हा फोटो एका आभार कार्याक्रातील आहे. या कार्यक्रमात २०१८ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जुईझ डी फोरा (एमजी) मध्ये चाकू हल्ला झाल्याची आठवण आल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो रडले होते.

गूगलवरील या बाबत माहिती शोधली असता कळले की ९ सप्टेंबर,२०१८ च्या  दि गार्डियनच्या एका लेखानुसार, ब्राझीलच्या पुढच्या महिन्यात होणार्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोल्सनारो यांच्यावर चाकूने वार केले होते, त्यामुळे ते गंभीर झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्या समर्थकांनी हल्ल्यानंतर त्यांना खांद्यावर उचलून त्वरित रिओसॅन जेनेरोच्या उत्तरेस सुमारे १२५  मैल (२००  किमी) बोल्सोनारोला जुईझ दे फोरा शहरातील रुग्णालयात नेण्यात आले.

खाली आपण इटालियन पंतप्रधान ज्युसेप्पी कोन्ते आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो यांच्या छायाचित्रांची तुलना पाहू शकता.

त्यामुळे तथ्य-तपासणीनंतर वरील पोस्ट चुकीची असल्याचे आढळले आहे. सोशल मीडियावरील व्हायरल चित्र इटालियन पंतप्रधान सेप्पे कॉन्टे यांचे नाही तर ब्राझीलचे अध्यक्ष जैयर बोल्सनारो यांचे आहे, हे चित्र २०१९ मधील  थँक्सगिव्हिंगचे आहे, जेव्हा २०१८ मध्ये बोलसनोरोने त्यांच्यावरील हल्ल्याची आठवण करुन रडायला सुरुवात केली होती.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!