🕒 1 min read
बीड : जिल्ह्यातील सर्व इयत्ता 10 वी व 12 वी प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ज्यांनी क्रीडा विभागा मार्फत तथा भारतीय शालेय खेळ महासंघा मार्फत आयोजित शालेय स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. व एकविध खेळ संघटनेमार्फत आयोजित स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना खेळाबाबत सवलतीचे वाढीव क्रीडा गुण मिळण्याकरिता विहित नमुन्या मध्ये दोन प्रतीत प्रस्ताव दिनांक 28 मार्च 2020 रोजी पर्यंत प्रत्यक्ष या कार्यालयात सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.
याबाबत शाळा, विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय मुख्यध्यापक, प्राचार्य, क्रीडाशिक्षक, क्रीडा प्राध्यापक, यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड मार्फत कळविण्यात आले होते. कोरोना विषाणूचा( कोव्हीड-१९) या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने दिनांक 28 मार्च या तारखेत वाढ करून प्रस्ताव सादर करण्यास दि.22 एप्रिल 2020 पर्यंतचीमुदत होती. सदर कालावधीत प्रस्ताव कार्यलयच्या dsobeed2442@gmail.com या मेलवर सादर करणे बाबत कळविण्यात आले होते.
त्यानुसार कार्यालयात काही शाळा, विदयलाय ,उच्च माध्यमिक विद्यालया मार्फत प्रत्यक्ष व ई मेल द्वारे प्रस्ताव सादर केलेले आहेत. तसेच एकविध जिल्हा खेळ संघटना च्या अध्यक्ष/सचिवांना ही कळविण्यात आले होते की त्यांचे मार्फत आयोजित क्रीडा स्पर्धा मधील सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव क्रीडा गुण मिळणे करिता त्यांचे प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळास शिफारस करणे करिता संबंधित खेळांच्या राज्य संघटानशी संपर्क साधून दि.25/01/2019 व दि.17 मार्च 2020 च्या शासन निर्णय यामधील परिशिष्ट 3,4,व 5 मधील नमूद कागदपत्रे प्रत्यक्ष अथवा ई मेल द्वारे सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते परंतु अद्याप पर्यंत एकाही एकविध जिल्हा / संघटनेमार्फत कागदपत्रांची पूर्तता या कार्यालयास झालेली नाही.
राज्यात उद्भवलेल्या कोरोना(कोव्हीड-19) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे एखादा खेळाडू विद्यार्थी क्रीडा सवलत गुणा पासून वंचित राहू नये करिता ह्या वृत्तपत्र टिपणी प्रगटन द्वारे च्या खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर कळवायचे राहिले आहेत त्या शाळा, विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक, प्राचार्य , क्रीडा शिक्षक, क्रीडा प्राध्यापक आणि एकविध खेळाच्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष/ सचिवांना दिनांक 10 मे 2020 पर्यंत पुनश्च एकदा मुदत वाढ देण्यात येत आहे.
शाळा, विद्यालय, उच्चमाध्यमिक विद्यालय, यांनी यापूर्वी कार्यालयाच्या ईमेलवर प्रस्ताव सादर केलेले आहेत त्यांनी मूळ दोन प्रतीत प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलयात दि.09 मे 2020 रोजी दुपार 05 वाजेपर्यंत सादर करावेत. एकविध खेळाच्या जिल्हा व राज्य क्रीडा संघटनेने त्यांची सर्व कागदपत्रे ही 09 मे 2020 पर्यंत कार्यलयात प्रत्यक्ष अथवा dsobeed2442@gmail.com या ई मेलवर द्वारें सादर करावेत, वेळेत वास्तव व कागदपत्र कार्यालयात सादर केले नाही तर संघटनेच्या खेळाडूच्या गुण वाढीचे प्रस्ताव शिक्षण मंडळास शिफारस करून पाठविण्यात येणार नाहीत. त्यांची सर्व जबाबदारी संबंधित जिल्हा/राज्य खेळ संघटनेची राहील व त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अधिक च्या माहिती करिता अरविंद विध्यगर मो.क्र.9422243435 / 9075842039 व अजय पवार मो.क्र.9890034321 यावर संपर्क साधावा.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

