Share

प्रत्येक शासकीय कार्यालयात मेवायकी वृक्षलागवडीचा प्रयोग करावा : पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

Published On: 

लातूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कमी जागेत जवळपास सुमारे १५० जातीचे विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली आहे. ही मेवायकी पद्धतीची वृक्षलागवड रिकामी जागेची उपलब्धता असलेल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात करावी, असे आवाहन राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी या या मेवायकी पध्दतीने लागवड केलेल्या वृक्षाची पाहाणी पर्यावरण राज्यमंत्री बनसोडे यांनी केली. त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने उपस्थित होते.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने मेवायकी या जपानी पद्धतीने केलेली वृक्ष लागवड ही इतर शासकीय कार्यालयांसाठी आदर्शवत अशी आहे ही वृक्ष लागवड पर्यावरणपूरक असून या ठिकाणी जवळपास 150 प्रकारच्या जातीचे वृक्षांची लागवड केलेली आहे. तसेच या ठिकाणी या वृक्षा साठी बारामाही पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे त्यामुळे या भागातील चांगल्या पर्यावरणासाठी ही वृक्ष लागवड पोषक ठरणार आहे, असे मत पर्यावरण राज्यमंत्री बनसोडे यांनी व्यक्त करून राज्य शासनाच्या प्रत्येक कार्यालयाच्या परिसरात असा पर्यावरण पुरक उपक्रम राबविण्यात यावा असे आवाहन त्यांनी केले.

ही वृक्ष लागवडीची जपानी पद्धत असुन कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली जाते. या ठिकाणी जवळपास नऊ ते दहा हजार झाडे लावली आहेत यात पिंपळ, लिंब,कोरफड अशी कमी पाणी लागणारी वृक्ष आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिली.

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!