🕒 1 min read
औरंगाबाद : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल बसने अडथळा निर्माण होत असल्याने बस रस्त्याच्या बाजुला उभी करण्यास सांगण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करणे बस मालकाला चांगलेच महागात पडले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात ट्रॅव्हल्सच्या मालकाला विविध कलामां अन्वये साडेपाच हजार रुपयांचा दंड आणि कोर्ट उठे पर्यंतची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र व्ही.एस. कुलकर्णी यांनी ठोठाविली. संजय बाबासाहेब क्षिरसागर (४०, रा. संभाजी कॉलनी, एन-६ सिडको) असे आरोपी नाव आहे.
प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे तत्कालीन अंमलादार विशाल साहेबराव पाटील (३२) यांनी फिर्याद दिली होती. त्यानूसार, २६ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री फिर्यादी हे सहकार्यासोबत हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी बाबा पेट्रोल पंपाजवळ मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर अडथळा निर्माण करित हिमालया टुर्स आणि ट्रॅव्हल्सची बस (क्रं. एमएच-२०-डब्ल्यू-९९१३) उभी होती. फिर्यादीने बस चालाकाला बस रस्त्याच्या कडेला व्यवस्थीत उभी करण्यास सांगितले. त्याचवेळी ट्रॅव्हलचा मालक तथा आरोपी संजय क्षिरसागर तेथे धावत आला. त्याने बसमध्ये प्रवासी बसु द्या, त्यानंतर मी बस बाजुला लावण्यास सांगतो असे म्हणाला. त्यावर पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता तो पोलिसांशी अरेरावी करुन शिवीगाळ करु लागला. फिर्यादी त्याला समजावून सांगत असतांना त्याने फिर्यादीची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. त्यानंतर फिर्यादीने ही माहिती वरिष्ठांना कळवली. त्यानूसार फिर्यादीचे वरिष्ठ देखील घटनास्थळी आले, त्यांनी देखील आरोपीला समजावून सांगिण्याचा प्रयत्न केला असता आरोपी त्यांच्या अंगवार धावून गेला व त्यांच्याबरोबर अरेरावी केली. प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खटल्याच्या सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावनीअंती न्यायालयाने आरोपी संजय क्षिरसागर याला भादंवी कलम ३५४ आणि कलम ३३२ अन्वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्येकी दोन हाजर रुपये दंड कलम ३२३ अन्वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा, एक हजार रुपये दंड आणि महाराष्ट्र पोलीस अॅक्ट १०२/११७ अन्वये ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात अॅड. देशपांडे यांना अॅड. सिध्दार्थ वाघ यांनी सहाय केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
