Share

खळबळजनक! पाटोद्यात चोरट्यांनी पेट्रोल पंपावर चाकूचा धाक दाखवून दोन लाख लुटले

Published On: 

बीड: एकीकडे कोरोनाचे कहर सुरु आहे तर दुसरीकडे चोरांचा धुडगूस देखील मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. रविवारी रात्री जिल्ह्यातील पाटोदा येथे एका पेट्रोल पंपावर चोरांनी चाकूचा धाक दाखवत तब्बल २ लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच पेट्रोल पंपावर तोडफोड करत मोठे नुकसान केले आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून हा सर्व प्रकार केला असल्याचे समोर आले आहे.

पाटोदा शहराजवळ दोन किमी अंतरावर जामखेड रोडवर समर्थ पेट्रोल पंप आहे. नितीन पोटरे नामक व्यक्तीने हे पेट्रोल पंप सहा महिन्यांपूर्वी चालवायला घेतले होते. सध्या त्या ठिकाणी पोटरे यांचा भाचा प्रसाद दिवटे आणि राजेंद्र घुगे हे दोघेजण कामकाज बघत होते. रात्री ११.३० च्या सुमारास एका गाडीतून अचानक चार ते पाच जण त्या ठिकाणी आले व त्यांनी थेट दरवाजावर दगड मारत काच फोडून आत प्रवेश केला. त्या सर्वांचे चेहरे झाकलेले होते. त्यांनी थेट गळ्याला तलवार व चाकू लावत धमकावले व त्या ठिकाणी एका बॅगेत असलेले २ लाख रुपये घेऊन त्या दोघांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली व तेथून पसार झाले. जवळच असलेले एक लाख मात्र वाचले.

एपीआय महेश आंधळे, कोळेकर, पीएसआय ए.टी. पठाण यांच्यासह पोलिस पथक तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले होते. या पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडथळे येत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिस तपासात अडचणी येणार आहेत. दरम्यान, सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली. वेगवेगळ्या अँगलने पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच या चोरांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!