टीम महाराष्ट्र देशा : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 22 एप्रिल 2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत कोरोना (कोविड-19) बाहयरुग्ण विभागात एकुण 35 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजपर्यंत एकुण 6177 व्यक्तींची तपासणी झाली. त्यापैकी एकुण 200 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 187 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन यापूर्वीच दिनांक 04 एप्रिल 2020 रोजी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते. पॉझिटीव्ह आलेल्या 8 रुग्णांची 14 दिवसानंतर पुन: तपासणी करण्यात आली होती त्या सर्व ८ रुग्णांचे अहवाल दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी निगेटीव्ह प्राप्त झाल्यामुळे त्यांना या रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच इतर ५ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत जिल्हा आरोग्य विभागाकडुन एकुण ४१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्या सर्व ४१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. (अद्यापपर्यंत लातुर जिल्हयातील एकुण 241 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे ). आजपर्यंत 141 व्यक्तींचा Home Quarantine कालावधी समाप्त झाला असुन एकुण 30 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantine मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच 24 व्यक्तींना Institutional Quarantine मध्ये ठेवण्यात आले आहे व 05 व्यक्तींना या संस्थेच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. मारुती कराळे यांनी दिली.
प्राथमिक तपासणी नंतर COVID-19 आजारा सारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना बाधित / संशयित व्यक्तींचा संपर्क झाला असेल तर अशा व्यक्तींना व प्रवाशांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर येथील कोरोना विलगीकरण कक्षात तपासणीसाठी पाठविण्यात यावे असे आवाहन डॉ. गिरीष ठाकुर अधिष्ठाता, व डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी केले आहे.
कोरोना (कोविड-१९) संशयित / बाधित व्यक्तींचे स्वॅब घेताना वैद्यकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले ग्लास कियोस्क (GLASS KIOSK) हे नेचर केअर फर्टीलायझर्स प्रा. लि. विटा जि. सांगली यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस भेट (Donate) दिले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

