Share

व्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रनिर्माता – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली  : व्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय हा राष्ट्रनिर्माता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज केले.

येथील विज्ञान भवनात ‘जागतिक मादक पदार्थ दुरूपयोग आणि अवैध व्यापार विरोधी दिवसा’ निमित्त केंद्रीय समाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे मद्यपान आणि मादक द्रव्यांचा दुरूपयोग रोखण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी राष्ट्रपती बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, विजय सांपला, कृष्णपाल गुर्जर, सचिव नीलम सहानी, सह सचिव सुरेंद्र सिंग मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध श्रेणीतील एकूण ९ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

कोणतेही व्यसन हे विनाशाचे द्वार आहे, असे सांगत राष्ट्रपती म्हणाले, यामुळे व्यक्तीचे, समाजाचे तसेच देशाचे नुकसानच होते. प्रत्येकाने व्यसनमुक्तीच्या या लढ्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सहभाग नोंदवून राष्ट्रनिर्माणात महत्त्वाची भूमिका निभावली पाहिजे.

व्यसन हे व्यक्तीसह समाजाला गिळंकृत करते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचे वाईट परिणाम दिसून येतात, असे राष्ट्रपती म्हणाले. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता अधिक दिसून येते. सातत्याने होणारे बदल, स्पर्धा यामुळे येणारी निराशा आणि त्यातून वाढती व्यसनाधीनता ही प्रमुख कारणे आहे. व्यसनाधीनतेपासून परावृत्त करणे, स्वत: विचारपूर्वक वागून कधीही कोणत्याही व्यसनाला बळी न पडणे म्हणजेच समजूतदारपणाचे लक्षण असल्याचाही उल्लेख राष्ट्रपती श्री. कोविंद यांनी केला.

१९८७ पासून आंतरराष्ट्रीय नशामुक्ती दिवस पाळला जातो. भारतासारख्या वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीत असणाऱ्या देशात याचे विशेष महत्त्व असल्याचेही राष्ट्रपतींनी सांगितले.

मुंबईतील ‘नशा बंदी मंडळा’ला ‘सर्वोत्कृष्ट लाभ-निरपेक्ष संस्थेचा’ पुरस्कार
मुंबईतील ‘नशाबंदी मंडळा’ला ‘सर्वोत्कृष्ट लाभ-निरपेक्ष संस्थेचा’ राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास आणि अमोल मडामे यांनी स्वीकारला. ही संस्था १९५८ पासून कार्यरत आहे.

मद्यपान करणारे विद्यार्थी, तरूण, ज्येष्ठ नागरिकांसाठी नशाबंदीचा कार्यक्रम या मंडळाद्वारे आयोजित केला जातो. या मंडळाचा मुख्य उद्देश तरूणांना मादक पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करणे हा आहे. मागील वर्षभरात जवळपास ७५० व्यक्तींना व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्याचे काम या संस्थेने सचोटीने केले आहे.

मादक द्रव्य, तंबाखू, मद्यपानामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत नशा मंडळाच्या वतीने जागरुकता निर्माण करणारे कार्यक्रमही राबविले जातात. व्यसनाधीनतेला बळी पडलेल्या व्यक्तींचे पुनर्वसन आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर मंडळ सातत्याने कार्य करत असते.

नशाबंदी मंडळाला त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल यापूर्वी २०१२ मध्ये ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!