Share

‘पावसामुळं २५ लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडेनात, हात टेकले यांच्यासमोर’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शनिवारी रात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यामुळे रविवारी अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासह भिंत, इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. तीन दुर्घटनांमध्ये ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, पाणी तुंबणे, इमारती पडणे याला महापालिका प्रश्नासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत विरोधकांनी हल्लाबोल केला होता. तर, या दुर्घटनेननंतरही मुख्यमंत्र्यांनी घर सोडलं नाही असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

‘मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मा.मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. तर, ‘मुंबईतील जीवितहानीची कोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. यानिमित्ताने तरी नालेसफाईतील टक्केवारी व महापालिकेकडून होणारी अक्षम्य हेळसांड यांची उलटतपासणी होईल का?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!