नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित करताना देशातील १८ वयोगटावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याबाबतची घोषणा केली. या घोषणेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानेही लसीकरणासाठीच्या ऑनलाईन नोंदणीच्या आवश्यकतेवर आक्षेप घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, नियोजन करणाऱ्यांना सत्य परिस्थितीची जाणीव असायला हवी.
तर आता आपल्या राहुल यांनी लसीकरणाआधीच्या ऑनलाईन नोंदणीवर आक्षेप घेतला आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, कोरोना लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रत्येकाला लस मिळायला हवी. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता नसावी. कारण जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही.
वैक्सीन के लिए सिर्फ़ online रेजिस्ट्रेशन काफ़ी नहीं। वैक्सीन सेंटर पर walk-in करने वाले हर व्यक्ति को टीका मिलना चाहिए।
जीवन का अधिकार उनका भी है जिनके पास इंटर्नेट नहीं है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 10, 2021
राहुल गांधी यांनी कोरोनाविरोधी मोफत लसीकरणाच्या निमित्ताने मोदी सरकारला एक प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी म्हणतात, ‘एक सोपा प्रश्न, जर सर्वांसाठी लस मोफत असेल, तर खाजगी रूग्णालयांमध्ये ही लस देण्यासाठी पैसे का आकारले जात आहेत?’ असा सवाल त्यांनी केला. त्यांनी एकुणच खाजगी हॉस्पिटलमधील लसीकरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही ऐकलं नाहीत, तर परिस्थिती बिकट होईल’, कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला घरचा आहेर
- ‘चंद्रकांत पाटील त्यांच्या मतावर कधीही ठाम नसतात’; ‘वाघासोबतच्या मैत्री’वरून खडसेंची कोपरखळी
- नुकसान भरपाई देण्यास नकार, पीकविमा कंपनी विरोधात शिवसेनेची हायकोर्टात धाव
- ‘मराठा समाजाला मराठवाड्यात ओबीसीतून आरक्षण द्यावे’, प्रा.प्रदिप सोळंकेंची मागणी
- ‘भाजपच्या यशामागे मोदींचा चेहरा, तेच भाजपचे नेते’, राऊतांनी कौतूक केल्याने भुवया उंचावल्या


