🕒 1 min read
वसई : चोर समजून पोलिसांनी वसईच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आदिवासी लोकांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र आद्यपपर्यंत या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात राहणाऱ्या या महिला पोटची भूक भागवण्यासाठी वसईच्या पापडी तलाव कोळीवाडा या ठिकाणी राहण्यास आल्या आहेत. या महिला वसईत बिगारी काम करतात रोज प्रमाणे या महिला शुक्रवारी वसई पश्चिमेच्या पापडी येथील बाजारात काम करत असताना काही नागरिकांनी या चोरी करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना दिली.
यावेळी पोलिसांनी त्यांना रिक्षात बसवून पापडी चौकीत नेले. येथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना दांडुक्याने मारहाण करत चोरीचा आरोप लावला असल्याचे आदिवासी महिला सांगत आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी या पोलिसांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वसईत पोलिसांनी चोर समजून ६ आदिवासी महिलांना बेदम मारहाण केलीय…
पोलिस यंत्रणांची.. #MVA सरकारची हीच खरी वृत्ती आहे.. इंग्रजांच्या जुल्मी राजवटी सारखी
पोलिसाचं तात्काळ निलंबन करावं आणि संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं चालतंय हे दाखवून द्यावं
जय भीम !#संविधान_दिवस
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 26, 2021
चित्रा वाघ यांनी ट्विट करत लिहिले की, ‘वसईत पोलिसांनी चोर समजून ६ आदिवासी महिलांना बेदम मारहाण केली. पोलिस यंत्रणांची, महाविकास आघाडी सरकारची इंग्रजांच्या जुलमी राजवटी सारखी हीच खरी वृत्ती आहे. पोलिसाचं तात्काळ निलंबन करावं आणि संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं चालतंय हे दाखवून द्यावं, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे.’
दरम्यान, महिलांना मारहाण केली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावरुन तपास सुरु असून चौकशीनंतरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल
- मागील सात वर्षांत झालेली इंधनाची जबर दरवाढ हेच महागाईच्या भरारीचे मुख्य कारण- संजय राऊत
- राजनाथ सिंह यांनी केला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींच्या ‘त्या’ फोटोचा खुलासा
- आज विज्ञानाचा आग्रह किंवा आस्था निर्माण करण्याची आत्यंतिक गरज- शरद पवार
- हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं- भगतसिंह कोश्यारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
