Share

इंग्रजी सर्च केले तरी गुगलवर मिळणार मराठीत रिझल्ट

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : इंटरनेटवर प्रादेशिक भाषांचा वाढता वापर बघता गुगलने भारतासह काही प्रादेशिक भाषांना प्राधान्य देण्याचे ठरकवले आहे. त्यानुसार आता मोबाईलवर गुगल सर्च इंग्रजीत केल्यावर त्याचा कंटेट मराठी भाषेमध्ये मिळणार आहे.

आतापर्यंत मोबाईलवर गुगल सर्चचा रिझल्ट केवळ इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषांमध्ये येत होता. लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगल इंडिया कंपनीने आज प्रादेशिक भाषांसंदर्भात मोठी घोषणा करत पुढच्या महिन्यापासून ही सेवा सुरू होत असल्याचे सांगितले.

गुगलने मल्टीलँग्केज मॉडेलची घोषणा करताना निवडण्यात आलेल्या भाषांना बहुभाषिक प्रतिनिधित्क असे म्हटले आहे. हिंदुस्थानात भाषांचे मोठे आव्हान आहे. तिथे 100 किलोमीटरवर भाषा बदलते. त्यामुळे कंपनी एकाच भाषेला सपोर्ट करत नाही, असे गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

भारतीय युजर्सना आता गुगल मॅप्सदेखील प्रादेशिक भाषांमध्ये बघता येणार आहे. त्याचा प्रवासादरम्यान त्यांना खूप फायदा होईल. यासाठी फक्त गुगल मॅप्सच्या सेटिंगमध्ये जाऊन आपली प्रादेशिक भाषा निवडावी लागणार आहे. गुगल असिस्टंटमध्येही स्थानिक भाषेचा पर्याय असणार आहे.

दम्यान, गुगल आता तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन अँप ‘ट्रू कॉलर’ला आता गुगल रिप्लेस करण्याच्या तयारीत आहे. Phone by Google चे नवीन व्हर्जन गूगल लाँच करण्याची तयारी केली आहे. या नवीन अ‍ॅपचे नाव गुगल कॉल (Google Call) असे असणार आहे. या आगामी मोबाइल अ‍ॅपमध्ये युजर्सला कॉलर-आयडी आणि स्पॅम कॉल थांबविण्याची सुविधा मिळेल. तसेच, कंपनी या अ‍ॅपद्वारे ट्रू कॉलरअ‍ॅपला टक्कर देण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!