Share

चर्चच्या जागेवर केलेले अतिक्रमण करणाऱ्यांनी दिली धर्मगुरूला जीवे मारण्याची धमकी

Published On: 

औरंंगाबाद : चर्चच्या जागेवर केलेले अतिक्रमण काढुन घ्या असे सांगण्यासाठी गेलेल्या धर्मगुरू अनिल मोजेस घोडके (वय ६८,रा.नंदनवन कॉलनी) यांना तीन जणांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मिटमिटा परिसरातील गट क्रमांक १२७ मध्ये घडली.

छावणी येथील चर्चचे धर्मगुरू हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चची साफसफाई करण्यासाठी गेले असता, गोपीचंद तुपे, सुभाष तुपे, फुलचंद तुपे रा. पडेगाव यांनी चर्चजवळ अतिक्रमण केले. त्यानंतर त्यांनी धर्मगुरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चर्चमध्ये जावू दिले नाही.

दरम्यान, त्याच वेळी या तिघा आरोपींनी धर्मगुरूसह त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या धर्मगुरूंनी छावणी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणी तीन जणांविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!