Share

#Corona : जगातून कोरोना 9 डिसेंबरला रजा घेणार, तर भारत 26 जुलैलाचं कोरोनामुक्त होणार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनाच्या बाबतीत दिलासादायक देणारे वृत्त समोर आले आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा अंत 9 डिसेंबरपर्यंत होणार आहे, असा दावा सिंगापूरच्या टेक्नॉलॉजी अँड डिझाइन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी  केला आहे.

तर भारतात याआधी कोरोनाचा प्रसार थांबेल. यासाठी त्यांनी एक अंदाजही वर्तवला आहे. संशोधकांच्या मते भारत 26 जुलैपर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे भारत लवकरचं कोरोना मुक्त होणार असून घरात अडकून बसलेली मंडळी बाहेर जाऊ शकणार आहेत.

सध्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे कोरोना विषाणूचा अंत कधी होईल? लॉकडाऊन रद्द केल्यानंतर कोरोना विषाणूची लागण अधिक वेगाने होईल किंवा नाही?  मात्र आता सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाइनच्या संशोधकांनी लोकांच्या या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करून डेटा अ‍ॅनालिसिसद्वारे ही शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान जगभरात कोरोनाव्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही कोरोनानं 28 हजारांचा आकडा पार केला आहे. तर, जगभरात हा आकडा 30 लाख लोकांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील सर्वच देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. दुसरीकडे दिवसरात्र वैज्ञानिक कोरोनाला हरवण्यासाठी उपाय योजना शोधत आहेत.

देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown 

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!