टीम महाराष्ट्र देशा – नोवल कोरोनाव्हायरस संदर्भात उपाययोजना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शक्य असलेल्या सर्व उपाययोजना करत आहे. मात्र, सद्य परिस्थितीत नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहचवणे गरजेचे आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने नोवल कोरोनाव्हायरस संदर्भात वार्तांकन करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना देशातील प्रसार माध्यमांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याप्रमाणेच प्रसार माध्यमांना काम करताना काही समस्या असतील, तर त्यांनी स्थानिक प्रशासना बरोबर समन्वय ठेवावा, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
तसेच वार्तांकन करण्यात अडथला येऊ नये यासाठी त्यांना इंधनाचा तसेच विजेचा पुरवठा करण्यात यावा असेही निर्देश देण्यात आले आहेत.


हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

