🕒 1 min read
नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कोरियाच्या सोन वान हो याने श्रीकांतचा २१-१४, २१-१८ असा पराभव केला.
श्रीकांतच्या पराभवसह स्पर्धेच्या पुरूष एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान, महिला एकेरीत सिंधू आणि सायनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
